बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांना होत असलेला मानसिक व आर्थिक त्रास : वैभव एडके
आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाच संकट निर्माण झाले आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा हा महाराष्ट्र मध्ये एक चर्चेचा विषय झालेला आहे. रोज राज्याचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून लाइव्ह येतात आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात पण एकदाच काय तो निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा हा का करत नाही...? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सातत्याने निर्माण होतोय. सोबतच आज महाराष्ट्रामध्ये अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी बॅकलॉग चे विद्यार्थी आज संभ्रमावस्थेत आहे कारण एक वेळेस उदय सामंत जी Facebook लाईव्ह घेतात त्यामध्ये सांगतात की विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल विद्यार्थ्यांच्या मनातला निर्णय होईल पण हा निर्णय नेमका कधी होणार..? हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय.
दुसरे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या संदर्भात जाणून घेतले पाहिजे की विद्यार्थी संभ्रमावस्थेत व सोबतच डिप्रेशनमध्ये मध्ये गेले आहेत कारण या सगळ्याच्या मध्ये जवळजवळ आता दोन महिने उलटले आहेत हा सगळा प्रकार सुरू आहे आणि अशा सगळ्या प्रकारामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत जाणं हे साहाजिक आहे आणि यामध्ये शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशीच इच्छा सामान्य विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची आहे. आपण एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घेतले पाहिजे की विद्यार्थी परीक्षेला घाबरत नसून विद्यार्थी आज कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या अशा सगळ्या परिस्थितीला घाबरतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ऑफलाईन परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा घेणे सध्या तरी शक्य दिसत नाही आणि अशा सगळ्याच्या मध्ये परीक्षेचा विषय इतका लांबवलेल्या मुळे हा विषय विद्यार्थ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. कारण बरेच विद्यार्थी या सगळ्या प्रक्रियेमुळे संभ्रमावस्थेत गेलेले आहे शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत हे वारंवार सांगत आहेत की काही लोक मुद्दामून संभ्रमावस्थेच वातावरण निर्माण करतात पण या सगळ्यांच्या मध्ये शासनाच तर या सगळ्या संभ्रमाच्या वातावरना ला जवाबदार नाही न हा सुद्धा प्रश्न यासंदर्भात उपस्थित होतो.
कारण आपण बघितलं पाहिजे आज महाराष्ट्र एक नंबरच राज्य ठरलेल आहे की जिथे कोरोनाची परिस्थिती फार गंभीर आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार या दोन्ही सरकाराने हे बघितलं पाहिजे की विद्यार्थी आज संभ्रमावस्थेत आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांचा विचार कोणीच करत नसून रेगुलर विषयांचा निर्णय शासनाने घेतला परंतु या सगळ्यांच्या मध्ये शासनाने ज्या वेळेस हा निर्णय घेतला त्या वेळेस कायदेशीर बाजू आधीच तपासल्या असत्या तर कदाचित आत्तापर्यंत अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निर्णय झालेला असतात आणि आता फक्त बॅकलॉग चा निर्णय राहिला असता विद्यार्थ्यांना या विषयांमुळे मानसिक त्रास भोगावा लागतोय सोबतच जे विद्यार्थी बाहेरगावी राहतात अशा विद्यार्थ्यांना घर भाड्याचा मुद्दा सुद्धा खूप चिंताजनक आहे याबद्दल आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो अशा करतो आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल जर आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉग चॅनेल ला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे सगळे ब्लॉक आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद
BLOG : वैभव गोविद एडके
Comments If You Have Any Queries
Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn
Blog:
Istagram
Youtube :
.
#publicspeaker #vaibhavedke #msbtebacklogexams #backlogexams #atkt #ydstudents

0 Comments
Post a Comment