दोन महिन्यांहून अधिक काळ राज्य शासनाने दिलेल्याया परिक्षे बाबत च्या निर्णयाला उलटून गेला आहे. तरी आज महाराष्ट्रामध्ये बॅकलॉग आणि अंतिम परिक्षे बाबत चा अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही.
अशा वेळेस नेमक्या कुठल्या बैठका मा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री घेत आहे...? हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारल्या जातोय.
जर आत्ता बैठका सुरू आहे तर इत्या दिवस माननीय मंत्र्यांनी काय केलं हा साधा प्रश्न सामान्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आज महाराष्ट्र शासनाचं,विद्यापीठांवर सुद्धा कुठल्याच प्रकारचे नियंत्रण नाही असे दिसून येते कारण परीक्षा झालेल्या नसतांना विद्यापीठ आणि त्याच्या अंतर्गत येणारे महाविद्यालय आपल्या आपल्या पद्धतीने ऍडमिशन संदर्भात ले नोटिफिकेशन्स काढत आहे आणि या सगळ्या नोटिफिकेशन्स मुळे ऍडमिशन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहे. कुठलीही ऍडमिशन घ्यायची म्हटली की मागच्या वर्षीची मार्कशीट किंवा प्रोविजनल डिप्लोमा / डिग्री ही कंपल्सरी असते. जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार नाही हेही तितकच खर आहे कारण संपूर्ण विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली तर जवळ जवळ 8 ते 10 लाखांच्या घरात आहे आणि त्यातल्या त्यात बॅकलॉग चे विद्यार्थी हे 3 ते 4 लाख इतकी आहे आणि जर बॅकलॉग च्या विद्यार्थ्यन कडे लक्ष नाही दिल तर इतक्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही का...? असा प्रश्न विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सातत्याने सतावतोय.
2 दिवस 2 दिवस म्हणून म्हणून अजून वाट किती बघायची हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सातत्याने येतोय. आज महाराष्ट्र सरकार या विषयावर काम करत असेल परंतु अजून किती दिवस विद्यार्थ्यांनी वाट पाहावी.किती निवेदन द्यायचे किती सरकारच्या पाया पडायचं. जेव्हापासून परीक्षेचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्यानंतर कितीतरी राज्यांनी या संदर्भात ठोस निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना या संभ्रमावस्थेतुन बाहेर काढल हे ही तितकंच खरं आहे. महाराष्ट्र इतका पुरोगामी असतानासुद्धा का महाराष्ट्रामध्ये परिक्षे संदर्भातला निर्णय घेण्या करिता इतका वेळ लागतोय...? विरोधकांच्या दबावामुळे तर शासन निर्णय घ्यायला वेळ लावत नाही आहे ना...? असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो संपूर्ण विद्यार्थी ज्या वेळेस शासनाच्या बाजूने आहेत तर मग विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही मला अस या ठिकाणी नमूद करावास वाट्ट.
परीक्षांचा निकाल कधी लागणार हा विषय तर सोडाच पण रेचाकींग च्या निकाल सुद्धा अजून विद्यापीठांना लावला नाही त्याच्या माध्यमातून सुद्धा बरेच विद्यार्थी पास होऊ शकतात पण त्याचा निकाल सुद्धा अजून लागलेला नाही. यामध्ये विद्यार्थ्यांनी करावं तरी काय ..?
त्यातही काही लोकांचा अजूनही म्हणणं सुरू आहे की परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाइन पद्धतीने घ्या.या परिस्तिथी मध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. देशातील सर्वोच्च मानले जाणारे ठिकाण म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा याच सुद्धा सत्र हे रद्द करण्यात आलेला आहे या विषयाचा विचार शासन तातडीने करू शकते तरी परीक्षेबाबत असा निर्णय तातडीने घेण्यास शासनाला काय अडचण आहे...?
या सगड्याच्या मध्ये तर हेच दिसून येते की विद्यार्थ्यांची बाजू घेणार कोणीच नाही आणि अश्या सगळ्याच्या मध्ये शासनाने लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय जाहीर करावा आणि विद्यार्थ्यांना या संभ्रमावस्थेत न बाहेर पडावं अन्यथा विद्यार्थ्यांनी जर विद्रोह केला तर शासनाला व प्रशासनाला महाग पडेल हे ही तितकच खर आहे.
BLOG : VAIBHAV GOVIND EDKE

0 Comments
Post a Comment