भारताचे संविधान हे सर्वांसाठी आहे हे खरे पण मला शंका आहे भारताच्या संविधानातील उद्देशिका आणि संविधान मधील शब्द हे सर्वांनी वाटून घेतले आहे.
माझ्या अनुभव आणि चिंतन नुसार पुढील उदाहरण देऊ शकेल.
जात पात आणि धर्म न मानणार्यांनी समाजवाद हा शब्द घेतलेला दिसत आहे.
कम्युनिस्ट आणि नास्तिक लोकांनी धर्मनिरपेक्ष हा शब्द घेतलेला आहे.
राजेशाही लोकांनी गणराज्य हा शब्द घेतलेला आहे.
पुरोगामी लोकांनी विज्ञानवाद, बंधुता आणि स्वातंत्र्य हा शब्द घेतलेला आहे.
दलीत व बुद्धिष्ट चळवळीतील लोकांनी स्वातंत्र्य आणि समानता हा शब्द घेतलेला आहे.
सहिष्णू संप्रदायातील लोकांनी स्वातंत्र्य आणि बंधुता हा शब्द घेतलेला आहे.
हिंदुत्ववादी लोकांनी स्वातंत्र्य,व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता हा शब्द घेतलेला आहे.आपल्या विचारधारा पुरतेच.
मुसलमानांनी,जैन,ख्रिश्चन इतर अल्पसंख्याक समानता, सार्वभौम, स्वातंत्र्य आणि न्याय घेतलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे आम्ही भारताचे लोक हा शब्द राहिलेला आहे. यामध्ये लोकशाही आणि एकात्मता हे शब्द दिसत नाहीत.
पण या सर्व मधील लोकांनी आपापल्या विचारधारा आपापल्या संघटन आणि आपापले धर्म यासाठीच हे शब्द घेतलेले आहेत असे मला जाणवले आणि अशी मला शंका आहे.
याविषयी या मधील सर्व लोकांनी खुलासा करावा. माझ्या शंका दूर कराव्या..
मनीष देशपांडे, पुणे

0 Comments
Post a Comment