नवीन शिक्षण धोरण चांगल की वाईट बरेच समज गैरसमज निर्माण झाले आहे
पण काय आहे नवीन शिक्षण धोरण…?
भरता मध्ये शिक्षण धोरना ची अमल बजावणी 1968 रोजी पहिल्यांदा करण्यत आली होती,त्या नंतर 1986 ला, आणि आता 2020 रोजी नवीन शिक्षण धोरण हे आलेल आहे.
मागिलकाळा मध्ये काही छोटे मोठे बदल हे शिक्षण पद्धती मध्ये करण्यत आले आहे. जसे की RTE ( RIGHT TO EDUCATION ) परंतु जे नवीन शिक्षण धोरण 2020 मध्ये आले आहे. तो एक मोठा बदल या सगळ्याच्यामध्ये मनावा लागेल.
मागिल 1 ते 1.5 वर्षापासून या सगळ्या शिक्षण पद्धती बद्दल विचार सुरू होता आणि आता 2020 रोजी पुढंल शिक्षण धोरण कसं असेल याच स्वरूप निश्चित झाल आहे. आपण हा विषय समजण्या करिताया
शिक्षण धोरणाच विभाजन 3 भागांमध्ये करूया.
1.प्रि प्रायमरी
2.शालेय शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण आणि
3.उच्च शिक्षण
तर आपल्याला माहीतच आहे की आपल्या इथे आधी 10 + 2 ( दहावी ते बारावी ) अशी शिक्षण पद्धत होती किव्हा आहे. पण आता नवीन शिक्षण धोरणाचा जर आपण विचार केला तर आता ( 5 + 3 + 3 + 4 ) अश्या पद्धतीने शिक्षण असणार आहे. म्हणजेच
पहिले 5 वर्ष हे प्रि प्रयमरीचे 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी असे 5 वर्ष असणार आहे.
पुढचे 3 वर्ष म्हणजेच तिसरी, चवथी,आणि पाचवी आणि पुढील 3 वर्ष म्हणजे सहावी, सातवी आणि आठवी
आणि पुढील 4 वर्ष म्हणजेच नव्ही ते बारावी असे असणार आहेत.
सोबतच जी प्रेस रिलीज घेन्यत आली त्या मध्ये स्पष्टा पने म्हणन्यात आले हे या सगळ्या नवीन शिक्षण धोरणा मध्ये बोर्ड चा दर्जा कमी करण्यत येणार आहे.
या सोबतच 9 ते 12 वी चा जर आपण विचार केला तर आता सायन्स किव्हा गणित अशा विषया बरोबर आता म्यूजिक सारखे विषय सुद्धा घेता येणार आहे आणि अशा पद्धतीने विविध पर्याय सुद्धा विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे.
आता या नवीन शिक्षण धोरणा अनुसार प्रामुख्याने संख्या आणि
अक्षर वाचन या वर जास्त भर दिला जाणार आहे. या सगळ्या वर पाहणी करण्या साठी
स्वतंत्र यंत्रणा देखील असणार आहे. तसेच इ 6 वी च शिक्षण घेत असतांना आता VOCATIONAL कोर्सेस जसे की इलेक्ट्रिकल,मेकॅनिकल, वेल्डिंग सुद्धा विषय शिकता येणार आहे आणि INTERNSHIP चा पर्याय सुद्धा उपलब्ध करण्यत येणार आहे.
गुणपत्रिके मध्ये बदल
महत्वाच म्हणजे आता गुणपत्रिके मध्ये सुद्धा मोठा बदल
बघायला मिळणार आहे. या मध्ये आधी शिक्षकांना आपला अभिप्राय देण्या करिता छोटे
राखणे असायचे मात्र आता गुण पत्रिके मध्ये विद्यार्थ्यांचे , त्यांच्या वर्ग मित्रांचे ,आणि शिक्षकांचे सुद्धा अभिप्राय दिसणार आहे तसेच प्री प्रायमरी ते 12 वी जे 15 वर्षाच शिक्षण होईल त्याच सुद्धा एक वेगळ रिपोर्ट कार्ड या नवीन शिक्षण धोरणा
अनुसार असणार आहे.
उच्च शिक्षण
आता राहला विषय उच्च शिक्षणा चा तर आता उच्च शिक्षणाची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या मध्ये नवीन बॉडी ची स्थापना केली जाऊ शकते जेणे करून प्रवेश प्रक्रिया ही समान पद्धतीने राभवली जाईल.
उच्चशिक्षण घेत असतांना आता विविध पर्याय निवडता येणार आहे. जसे की समजा एखादा विद्यार्थी ENGINEERING च शिक्षण घेत असेल तर त्याला आता क्रीडा किव्हा म्यूजिक हा विषय सुद्धा आता व्यावसायिक अभ्यासक्रमा सोबत घेता येणार आहे आणि या विषयाचे मार्कं सुद्धा गुण पत्रिके मध्ये समाविष्ठ केले जातिल.
निविण शिक्षण धोरणा अनुसार आता
1. ई लर्निंग वर जास्त भर देणयत येणार आहे.
2. मधातूनच शिक्षण सोडायच असल्यास प्रमाण पत्रा सकट शिक्षण सोडण्याची मुभा देखील आता असणार आहे.
3. M.Phil कोर्से सूद्धा रद्द करण्यत येणार आहे.
4. जे शिक्षक चांगले शिकवत नाही अशा शिक्षकांना देखिल बरखास्त केल जाणार आहे.
5. ज्या शिक्षण संस्थान मध्ये शिक्षण व्यवस्थित दिल जात नाही अश्या शिक्षण संस्था देखील बंद करण्यत येणार आहे
या सगळ्या वर लक्षं ठेवण्या करिता स्वतंत्र यंत्रणा असणार आहे.
हे सगळे प्रमुख मुद्दे नवीन शिक्षण धोरणा मध्ये असणार आहे. या सगळ्या साठी GDP चा 6% आता शिक्षणावर खर्च केल्या जाणार आहे. पण खरच GDP चे 6 % खर्चा केल्या जातील का…? हे आपल्याला पुढच्या बजेट मध्ये कळणारच आहे.या विषयावर मत मतांतर जरी असले तरी नवीन शिक्षण पद्धती मुळे काय फरक पडेल हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणार आहे.




0 Comments
Post a Comment