कुलपती आणि युजीसी विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत - डॉ. विश्वंभर चौधरी
उदाहरणार्थ,
गणित मांडून पाहू.
एलएलबीची एकूण सहा सत्र असतात. प्रत्येक सत्र 500 मार्कांचं, एकूण अभ्यासक्रम 3000 मार्कांचा.
कोविडआधी पाच सत्र पूर्ण झालीत. म्हणजे 2500 मार्कांचं मूल्यमापन ऑलरेडी झालंय.
एक पेपर प्रॅक्टीकल पेपर असतो ज्यात मूट कोर्ट असतं. बहुतेक महाविद्यालयात हा पेपर पूर्ण झाला आहे.
म्हणजे झाले 3000 पैकी 2600 मार्क. उरले फक्त 400 मार्क.
या 400 मार्कातही प्रत्येक पेपरचे 20 असे एकूण 80 मार्क्स हे Internal Exam चे आहेत ज्या आधीच पूर्ण झालेल्या आहेत.
थोडक्यात काय तर 3000 पैकी 2680 मार्कांचं मूल्यमापन यथासांग पार पडलेलं असून परीक्षेचा जो विषय राज्यपालांनी विनाकारण प्रतिष्ठेचा केला आहे तो केवळ 320 मार्कांचा आहे. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं म्हणतात तसं जवळपास 90 टक्के मूल्यमापन पूर्ण झालं आहे आणि केवळ 10 टक्क्यांसाठी आरडाओरड, राजकारण चालू आहे.
कुलपती आणि युजीसी विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत.
खैर, राज्यपाल तर राजकीय आहेत (किंवा आता खेदानं म्हणावं लागतंय) पण खरा प्रश्न आहे कुलगुरूंचा!
महाराष्ट्रातील एकही कुलगुरू पुढे निघून काही विद्यार्थी हिताचं बोलायला तयार नाहीत.
कुलगुरूपद हे राज्यपाल पदासारखं शोभेचं कधीपासून झालं?
आणि तुम्हीच जर दोन्ही बाजूंच्या राजकारणाला घाबरून बोलणार नसाल तर तुम्हाला 'उद्याचे उज्वल नागरिक असलेले' विद्यार्थी घडवण्याचा कोणता नैतिक हक्क राहतो? कुलगुरू म्हणण्याऐवजी 'कुललघु' का म्हणू नये?
तुम्हीच विद्यार्थ्यांना हे शिकवत आहात की राजकारणी बोलले की आपण चिडीचूप रहायचं! वा रे नैतिकतेचं निर्भीड शिक्षण!
युजीसी आणि कुलगुरूंनाही हे कळत नाही की परिक्षा हा मूल्यमापनाचा फक्त एक रस्ता आहे. परिक्षा हे साध्य नसून फक्त साधन आहे हेही कळत नसेल तर सगळं व्यर्थ आहे. आणि खास करून कुलगुरू आणि युजीसीसारख्या वरिष्ठ संस्थेच्या माननीयांनाही हे कळत नसेल तर या देशाला देवही वाचवू शकत नाही.
Comments If You Have Any Queries
Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn
Blog:
Istagram
Youtube :
#vaibhabedke #vishwanbharchaudhari #mswa #publicspeaker

0 Comments
Post a Comment