शिक्षणाची सध्याची स्थिति आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिक संकट
‘’एक वेळेस कमी जेवण करा पण आपल्या मुलांना शाळेत घाला ’’ सांगणारे संत गाडगे बाबा आज या निमित्त्याने आठवले. त्या वेळेस संतांना सुद्धा शिक्षणाचं महत्व कळलेल होता.पण आज शिक्षण हे ज्ञानाच साधन राहिल नसून आता एक व्यवसाय झाला आहे. ही गोष्ट चुकीची जरी वाटत असली तरी ही सत्य परिस्थिती आहे. समाजातील शेवटच्या घटका पर्यंत शिक्षण पोहचणे ही संकल्पना देशयतल्या थोर पुरुषांनी मांडली परंतु आता कुठे तरी ही संकल्पना मागे पडतांना दिसत आहे.एका शब्दात जर सांगायच झाला तर
शिक्षण = पैसा असच म्हणावं लागेल. ही बोलण्याची वेळ आज का आली आहे कारण आपण आपल्या बाल पनाचा विचार करा किती पैसे भरून तुम्ही शिक्षण घेतल...?
आणि आज बालवाडी (Pre-Primary ) ला जरी एडमिशन घ्याची म्हंटल तरी आता लाखो रुपये फक्त डोनेशन चे भरावे लागतात. पण यात चुकी फक्त शिक्षण संस्थानांची नसून पालकांची सुद्धा आहे. शिक्षणाच बाजरीकरण करण्यात जितक्या शिक्षण संस्था जवाबदार आहेत तितके पालक सुद्धा आहे अस माझ ठाम मत आहे. गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्या करिता सरकारी शाळा,
माध्यम वर्गीयांच्या मुलांना शिक्षण घ्यायच असल्यास प्रायवेट शाळा,
आणि गर्भ श्रीमंतांच्या आणि राजकरण्याच्या मुलांना शिक्षण घ्यायच असल्यास विदेशात
ही साधारण वास्तविकता किव्हा सत्य परिस्तिथी आपल्या समाजा मध्ये आहे. पण या सगळ्यामध्ये जर शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर सगळ्यांच्याच मुलांना किमान 1 ली ते 5 वी शिक्षण हे सरकारी शाळेमध्ये सक्तीच करन आवश्यक आहे. तेव्हाच शिक्षणाच बाजारीकरण कमी होईल आणि शिक्षणाचा दर्जा देखील गर्भ श्रीमंतांच्या व राजकरण्याच्या भीती पोटी का होईना पण शिक्षणाचा दर्जा हा सुधारल्या शिवाय राहणार नाही. आज ग्रामीण भागात शिक्षणाची काय परिस्तिथी आहे. शाळे मध्ये 100- 150 विद्यार्थ्यां च्या मागे जवळ जवळ फक्त 8 ते 10 संगणक उपलब्ध आहे आणि हे वास्तविक परिस्तिथी आहे आणि आज अशी सगळी परिस्थिती असतांना ही
आपण ऑनलाइन शिक्षणा बद्दल बोलन कित पत योग्य आहे...?
शिक्षकांचे प्रश्न
आज शिक्षकांचे देखील असंख्य प्रश्न आहेत वेळेवर वेतन मिळत नाही, चांगल काम करून देखील शासन किव्हा शिक्षण संस्था दखल घेत नाही. शिक्षकांच्या जागा रिक्त असतांना सुद्धा शिक्षण भरती होत नाही आणि शिक्षण भरती जरी केली तरी त्या मध्ये होणारा कला बाजार हा काही कुणा पासून लपून राहले नाही.
विद्यार्थ्यांवरील आर्थिक संकट
आज संपूर्ण जग हा आर्थिक मंदी मध्ये आहे आणि अश्या सगळ्या मध्ये विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील यातून सुटलेले नाही आणि अश्या परिस्तिथी मध्ये एक पुढे आलेला मुद्दा म्हणजे एमआयटी ( MIT ) संस्था विद्यार्थ्यां कडून जास्त शिक्षण शुल्क घेतलं जात आहे. या प्रकरना मध्ये गेल्या कित्तेक दिवसां पासून विद्यर्थ्यंनी काही मागण्या लावून धरल्या आहे त्या म्हणजे की शिक्षण शुल्क भरण्या करिता पुरेसा वेळ देण्यात यावा परंतु या सगळ्या प्रकरणा मध्ये महाविद्यालया ने अजूनही दखल घेतलेली नाही.
विशेष म्हणजे एमआयटी संस्थे ने राम मंदिर निर्माणा करीता २१ कोटी रुपये दान केले आहेत. त्यांनी दान करावे आमचं या संदर्भात काही म्हणणं नाही परंतु विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत की शुक्ल भरण्या करिता पुरेसा वेळ मिळवा व जास्तीच शुल्क माफ करण्यत याव ह्या मागण्या तरी संस्थे ने मान्य करायला हव्या.
शिक्षणाची सध्याची स्थिति जर सुधारायची असेल आणि विद्यार्थी वरील आर्थिक संकट कमी करायचं असेल तर शासनाने, पालकांनी व शिक्षण संस्थांनी या विषयावर प्रमुख्या ने लक्षं दिल पाहिजे.
“ शिक्षण संस्था ह्या शिक्षण देण्या करिता आहेत त्यांना शिक्षणाच्या नावावर पैसे गोळा करण्याचा परवाना कोणीही दिलेला नाही “ हे ही त्यांनी लक्षात ठेवाव.
धन्यवाद.
+91 9405525240
Comments If You Have Any Queries
Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn
Blog:
Istagram
Youtube :
.
#publicspeaker #vaibhavedke #onlineeducation #feehike #mitstudents




0 Comments
Post a Comment