विश्वभुषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनी मध्ये लिहिल आहे की,
‘’ Law and Order are the medicine of the body politic and when the body politic get sick, medicine must be administered ‘’
-Dr.BR. Ambedkar
अशीच काहीशी परिस्तिथी आज देशा मध्ये निर्माण झाली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा व JEE / NEET चा मुद्दा
नुकताच मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकाला प्रमाणे अंतिम
वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार हा राज्य शासणा कडे नसून हा अधिकार
स्वायत संस्था UGC कडे आहे अस मा. सर्वोच्य न्यायालयाने आपल्या निर्णया
मध्ये सांगितलं.
मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही सन्मान करतोच परंतु आज खरच देशा मध्ये परीक्षा घेण्या सारखी परिस्तिथी आहे का...?
देशातील सर्व न्याय पालिका सुरू झाल्या आहेत का...?
देशातील संसद तरी सुरू करण्यात आली आहे का...?
देशातील शिक्षण संस्था देखील सुरु झाल्या आहेत का...?
परीक्षा आपण घ्या पण परीक्षा झाल्यावर पुढील शिक्षण वर्ष कधी सुरु होणार आहे याचे नियोजन केला आहे का...?
विद्यार्थ्यांनी परीक्षा जरी दिल्या तरी त्या नंतर त्यांना केंद्र सरकार नोकऱ्या देणार आहे का...?
या सगळ्या प्रश्नांची उत्तर केंद्र शासनाने द्यायला नको...?
कि सत्ते च्या अहंकारा पोटी आपण वाट्टेल ते कराल.
देशा मध्ये लोकतंत्र आहे हे आपण विसरू नये.
जर
या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे नसतील तर मग विद्यार्थ्यांनाच परीक्षा
केंद्र वर जाऊन परीक्षा देण्या करिता भाग पाडणे कित पत योग्य आहे...?
मा.
सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मानच करतो परंतु त्या
वर बोलायला सुद्धा देशा मध्ये बंधन आहे का...? आणि जर असे असेलच तर
लोकतंत्र कसं शाबूत राहील...?
लोकतंत्रा
मधल एक महत्व पूर्ण स्तंभ म्हणजे स्वायत्त संस्था आणि स्वायत्त
संस्थानांची स्वायत्ता संपविण्याच काम मागील काही वर्षां मध्ये झाला आहे
आणि ज्या ज्या वेळेस
लोकत्रांला
आणि संवैधानिक मूल्यांना संपविण्याच काम
अहंकारी सत्ते ने करण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेस स्वायत्त
संस्थांनीच त्यावर लगाम लावली आहे. पण आता स्वायत्त संस्थांनाच संपविण्याचा
कट अहंकारी सत्ते ने रचला आहे आणि हे देशा साठी घातक आहे.
आज देशाची जर परिस्तिथी बघितली तर कोविड-19 च्या बाबतीत भारताने उचांक गाठला आहे, कित्तेक राज्यान मध्ये पुर ग्रस्त परिस्तिथी आहे , कुठे तर जाण्या येण्याची सुद्धा सुविधा नाही आणि अश्या परिस्तिथी मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्या साठी भाग पाडण म्हणजेच त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केंद्र शासन यूजीसी च्या मध्यमातून करू पाहत आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळणं म्हणजेच त्याच्या संवेधानिक मूल्यांचं देखील हननच म्हणाव लागेल.
‘’ सत्ता पराभूत झाली तरी चालेल पण लोकतंत्र जिवंत राहायला पाहिजे आणि ते शाबूत ठेवायची जवाबदारी देशातील नागरिकांची आहे ’’.
BLOG : VAIBHAV GOVIND EDKE
+91 9405525240
COMMENT & SHARE TO MAXIMUM STUDENTS
Comments If You Have Any Queries
Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn
Blog:
Istagram
Youtube :
.
#publicspeaker #vaibhavedke #MSWA #JEE_NEET #AntiStudentNarendraModi
#NEETJEE #FinalYearExamNews





0 Comments
Post a Comment