विद्यार्थ्यांचा न्यायालयीन लढा आणि संघर्ष
दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असून सुद्धा अजूनही परीक्षे संदर्भातील कुठलाच ठोस निर्णय हा केंद्र शासन किंवा यूजीसी कढून अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही .
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टा मध्ये आणि भारताचे सर्वोच्च न्यायलय म्हणजेच सुप्रीम कोर्टामध्ये देखील या संदर्भातला खटला हा दाखल झालेला आहे या सगळ्यांच्या मध्ये विद्यार्थ्यांना अजून किती दिवस वाट पाहावी लागेल हा प्रश्न आता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आहे परंतु आपल्याला माहिती आहे की भारताच्या न्याय प्रक्रियेचा वापर करायचा म्हटला की यामध्ये पुरेसं संयम आणि धीर ठेवावा लागतो. काही केसेस मध्ये न्याय मिळाला आपण बघितलेल आहे की न्याय मिळवून घेण्याकरिता वर्षानु वर्ष खटल्या संदर्भात वाट बघावी लागते परंतु काही खटल्यान मध्ये असे होते की न्याय हा लवकर सुद्धा मिळतो. ही एक प्रक्रिया आहे आणि याला सामोरे जावेच लागेल हे ही तितकंच खरं आहे. हीच बाब जर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर झाली तर मला असं वाटतं की न्यायप्रक्रिये बद्दलची विद्यार्थ्यांची भूमिका त्यांच्या मना मध्ये असलेले समज गैरसमज हे सुद्धा यातून दूर होतील आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा न्याय प्रक्रियेवर विश्वास अजून मजबूत होईल की ज्यावेळेस देशातील सर्वोच्च असलेल्या ताकदीने मनमानी करण्यास सुरुवात केली त्या वेळेस आपल्याला जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते म्हणजे आपल्या न्याय प्रणाली ने आणि त्या वेळेसच कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मना मध्ये विश्वास निर्माण होईल की आपल्या देशामध्ये न्यायप्रणाली जिवंत आहे.
विद्यार्थी म्हटलं की आंदोलन आणि मोर्चे ह्याच गोष्टी डोळ्या समोर येतात पण आता लॉकडाउन असल्या मुळे ते शक्य होऊ शकले नाही. सोबतच विद्यार्थ्यांना कुठेही ही या न्याय प्रक्रियेचा अनुभव नाही आणि अशा सगळ्याच्या मध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेली संयमी भूमिका ही सुद्धा कौतुकास्पद आहे.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला तर मला असं वाटत की फार मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांचा न्यायालयावर असलेला विश्वास अधिक दृढ होईल कारण आपली न्याय प्रक्रिया आणि यासंदर्भातले विषय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये नसतात आणि अशामुळे जे विद्यार्थी लोकांकडून न्यायालयीन व्यवस्थे बद्दल एकूण असतात त्यावरच विश्वास ठेवतात.
आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की कोर्टाची पायरी कधीही चढू नये आणि आणि तेच विद्यार्थ्यांच्या मना मध्ये घर करून बसते आणि ही भावना मना मध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते की न्यालयामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही पण असे कित्तेक उदाहरण देता येईल की न्याय व्यवस्थे मुळेच लोकांना न्याय मिळू शकला आहे.
शेवटी इतकच सांगावस वाटत की जरी वेळ लागत असला तरी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या बाजूनेच असेल हीच अपेक्षा.
Contact : + 91 9405525240
Comments If You Have Any Queries
Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn
Blog:
Istagram
Youtube :
#vaibhabedke #mswa #supremecourt #finalyearexams
2 Comments
Hope for the best and quick descison from the court.
ReplyDelete👍👍👍
DeletePost a Comment