सत्तेचा अहंकार आणि असंवेदनशील सरकार
आज करोना सारख्या रोगाने संपूर्ण जगा मध्ये थैमान घातल असतांना भारत देश देखील यातून सुटलेला नाही.
करोना या रोगा मुळे असंख्य आव्हाने लोकं पुढे उभी झाली आहेत आणि अश्यातच एक आव्हान म्हणजे अंतिम वर्षा च्या परीक्षा आणि JEE/NEET च्या परीक्षा.
अंतिम वर्षा च्या परीक्षा कोरोना काळा मध्ये रद्दा केल्या जाव्यात या साठी मागील 3 महिन्यां पासून विद्यार्थी सातत्याने मागणी करत आहे पण परीक्षा रद्द तर सोडाच सरकार या विषयावर विद्यार्थ्यांशी बोलायला देखील तयार नाही.
हा मुद्दा जरी देशाच्या सर्वोच्य न्यायालयात असला तरी असंख्य विद्यार्थी आज देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या कडे आशा लाऊन बसले आहेत की कदाचित देशाचे सर्वात शक्तीशाली समजले जाणारे नेते तरी त्यांच म्हणणं एकतील.
परंतु पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी देखील विद्यार्थ्यंच्या विषया कडे काना डोळा करतांना दिसत आहे.
ऑनलाइन युगा मध्ये मा. नरेंद्र मोदी हे TWITTER या सोशल मीडिया मध्यमावर जास्त सक्रिय दिसतात. त्या मुळे विद्यार्थ्य्यंना आशा होती कदाचित ईथे तरी मा. पंतप्रधान विद्यार्थ्यांना उत्तर देतील पण अजून तरी अस काहीच होतांना दिसत नाही आहे.
यातून साहाजिकच प्रश्न निर्माण होतो की केंद्र शासनाला सत्तेचा अहंकार तर निर्माण झाला नाही न...?
सगळ्या छोट्या मोठ्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करतात मग आज विद्यार्थ्यांशी बोलायला त्यांना काय अडचण असावी...?
यात अस सुद्धा सांगितलं जत की शिक्षणा चे ठेकेदार यांचा केंद्र शासनाला दबाव आहे जेणे करून त्यांची दुकानं सुरू होतील.
याचा काही पुरावा जरी नसला तरी अशी सर्वत्र चर्चा आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा देणारे 10 लाख विद्यार्थी आणि JEE आणि NEET देणारे जवळ जवळ 25 लाख विद्यार्थी आहेत. यांची संख्या जर जोडली तर 35 ते 40 लाख विद्यार्थी होतात की ज्यांच आयुष्य धोक्यात घालण्याचा निश्चय मोदी शासनाने केला आहे.
JEE आणि NEET च्या सेंटर ची संख्या जरी वाढवली असली तरी ते विद्यार्थी संखेच्या मानाने खूप कमी आहे आणि अंतिम वर्षाच्या परीक्षांचा जर विचार केला तर 1000 Km चा प्रवास करन सध्या तरी विद्यार्थ्यांना शक्य नाही.
बिहार निवडणुका जवळ आहेत सगळे तरुण विद्यार्थी याच निमित्यांने सत्तेचा अहंकार झालेल्या लोकांना धडा शिकवेल हीच अपेक्षा करू शकतो.
आपल्या भाषांन मधला SKILL INDIA कुठे आहे...?
काय झाला त्या SKILL INDIA च..?
इतके वर्ष विद्यार्थी परीक्षा तर देतच आले आहे न, तरी तुम्ही नोकर्या का देऊ शकले नाही मग...?
'' हिंदू, मुस्लिम, राहुल गांधी, मंदिर, मस्जिद, तबलीगी '' यात तुम्ही विद्यार्थ्यांना अडकवु शकत नाही आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे
मला तर कधी कधी वाटतं प्रश्नांची उत्तर देण्याची हिम्मतच तुमच्यात राहली नाही अन्यथा इतक्या वर्षात एक तरी प्रेस कॉन्फरन्स आपण नक्कीच घेतली असती
'' आपण कदाचित विदेशात खूप नाव कमावल असेल पण भारत देशा मध्ये तुमचं सरकार एक अहंकारी आणि असंवेदनशील सरकार म्हणून भविष्यात ओळखल जाईल हे नक्की ''
BLOG : VAIBHAV GOVIND EDKE
+91 9405525240
COMMENT & SHARE TO MAXIMUM STUDENTS
Comments If You Have Any Queries
Our Social Links-
Facebook
Twitter
LinkedIn
Blog:
Istagram
Youtube :
.
#publicspeaker #vaibhavedke #MSWA #JEE_NEET #AntiStudentNarendraModi
#NEETJEE #
1 Comments
Really...their is need to cancel the final year exam.
ReplyDeletePost a Comment